‘शरद पवारांना लोक जाणता राजा म्हणतात, पण..’; शर्मिला ठाकरेंचं विधान

मुंबई | अयोध्येतील राम मंदिरातील उद्घाटनावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावरून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, विरोधी पक्ष असल्याने टीका करणे त्यांना भागच आहे. टीका केल्याशिवाय ते पुढची निवडणूक लढवूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य दैदिप्यमान आहे. त्यांना आपण देवासमान मानतो. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या पक्षातील लोक करतात तुलना.
हेही वाचा – मनोज जरांगे पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन केतकी चितळेची टीका!
शरद पवारांना त्यांच्या पक्षातील लोक जाणता राजा म्हणतात. पण आपण जाणता राजा कोणाला म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. निवडणुकी आधीचं बजेट चांगलंच असतं. खरं बजेट निवडणुकीनंतरचं असतं, अशीही प्रतिक्रिया शर्मिला ठाकरेंनी दिली.
जेव्हा जेव्हा जिथे जिथे माझ्या लोकांना माझी गरज लागली तिथे मी येणार. जिथे जो चांगला उमेदवार आहे तो द्यावा. महिला-पुरुष असा भेद करू नका. महिला उभी राहिली आणि ती काम करणार नसेल तर त्याला अर्थ नाही. सरकारचं काम दिसायला पाच वर्षे जायला लागतात. एक-दीड वर्षांत काय सांगणार? असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.





