Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

संत साई स्कूल येथे चित्रकला व हस्तकला प्रदर्शन उत्साहात

शिक्षण विश्व : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे वार्षिक कला महोत्सव

पिंपरी-चिंचवड | कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर -या उक्तीचा प्रत्यय देणारे चित्रकला व हस्तकला प्रदर्शन संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल, भोसरी येथे दि. २१ व २२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने शाळेत दरवर्षी कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कलाकृती सादर करून प्रदर्शन अधिक आकर्षक केले.

प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोकजी गोविंद नगरकर (निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ, डी.आर.डी.ओ., पुणे) तसेच ह.भ.प. डॉ. सुभाष महाराज गेठे (एम.ए. तत्त्वज्ञान, आध्यात्मिक वक्ते) उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा      :            मास्टर माइंड ग्लोबल स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

नगरकर यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेमागील वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला, तर डॉ. सुभाष महाराज गेठे यांनी बाल चित्रकारांचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यानंतर उपस्थितांनी प्रदर्शनातील विविध कलाकृती पाहून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे भरभरून कौतुक केले.

मान्यवरांची ओळख श्वेता नारायणगावकर यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन कोमल वाबळे यांनी केले. प्रदर्शनाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून त्यांनीही विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले.

हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शाळेचे कलाशिक्षक संजय अनर्थे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना मनोज वाबळे, अक्षय राणे, मालन लिगाडे, रिया पोतदार, भारती ढवळेश्वर तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी शाळेच्या संचालिका सुनिता ढवळेश्वर, संस्थेच्या विश्वस्त पायल ढवळेश्वर, रुपाली खोल्लम, स्वाती मोघे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कला ही केवळ चित्र काढण्याचे माध्यम नसून ती विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारी प्रक्रिया आहे. अशा प्रदर्शनांमुळे मुलांमधील आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या कल्पनांना योग्य व्यासपीठ मिळते.

– शिवलिंग ढवळेश्वर, अध्यक्ष.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button