मनोज जरांगे पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन केतकी चितळेची टीका!

Ketaki Chitale | मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी अभिनेत्री केतकी चितळेनी हुज्जत घातली. तसेच आरक्षणाबाबत तिने वादग्रस्त वक्तव्य केलं. यावरून केतकी चांगलीच ट्रोल झाली. दरम्यान, तिने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यावर पोस्ट शेअर केली आहे.
धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल. मग बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. याची पोस्ट केतकीने इस्टाग्राम स्टोरी शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची मोठी भूमिका

केतकीने मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा फोटो शेअर करून लिहिल आहे, आता कसे, खरे रूप दिसले. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये. आता तरी जागे व्हा. केतकीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.




