‘राज्यात पाच महिन्यात १९ हजार ५५३ महिला बेपत्ता’; शरद पवार यांची धक्कादायक माहिती

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. राज्यातून गेल्या पाच महिन्यात तब्बल १९ हजार मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच कंत्राटी भरतीवरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शरद पवार म्हणाले, नुकतंच पावसाळी अधिवेश झालं. त्यात १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२३ या काळात राज्यात किती महिला आणि मुली बेपत्ता झाल्या याची माहिती मागवण्यात आली होती. त्याचं उत्तर आलं आहे. या पाच महिन्यात राज्यातून १९ हजार ५५३ महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. यात १८ वर्षाच्या १४५३ मुलींचा समावेश आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं. महिला आणि मुली बेपत्ता झाल्याचा हा आकडा बघितल्यावर परिस्थिती किती गंभीर आहे हे दिसून येतं. राज्य सरकार आणि गृहखातं याची किती गांभीर्याने नोंद घेईल आणि उपाययोजना करेल हे पाहावं लागेल.
हेही वाचा – मोबाईलच्या जास्त वापराने डोळ्यांवर ताण येतोय? आजपासून करा ‘हे’ उपाय
पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ महिन्यासाठी त्यांची नियुक्ती असेल. कंत्राटी पद्धतीचा कार्यकाळ ११ महिन्याचा असणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे ज्या जबाबदार कशा सोपवल्या जातील हे पाहावं लागेल. संबंधित व्यक्तींना गर्दी नियंत्रण, कायदा सुव्यवस्था आदी व्यवस्था करणं आश्यक असतं. माझ्यासाठी अशी भरती चिंतेची बाब असेल. हे करणं योग्य नाही. त्याऐवजी होमगार्ड, सुरक्षा मंडळांना अधिक बळ दिलं तर कंत्राटी भरतीची गरज पडणार नाही. कंत्राटी ऐवजी कायम स्वरुपाची भरती व्हावी. आर आर पाटील यांनी अत्यंत पारदर्शक भरती प्रक्रिया केली होती. तीच ठेवावी, असं शरद पवार म्हणाले.





