मोबाईलच्या जास्त वापराने डोळ्यांवर ताण येतोय? आजपासून करा ‘हे’ उपाय

Eye Care : सध्याच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात मोबाईल, कॉम्पुटरचा वापर करतात. लहान मुलं तासनतास मोबाईलवर गेम खेळात असतात. यामुळे त्यांच्या डोळ्यांवर ताण येतो आणि डोकेदुखी सारखे आजार उद्भवतात. यामुळे कमी वयात चष्मा लागतो. अशावेळी डोळ्यांची योग्यरीत्या काळजी घेणं गरजेचं आहे.
‘या’ गोष्टींची घ्या काळजी
पामिंग : डोळ्यांची काळजी घेण्यासाठी पामिंग हा व्यायाम करणं गरजेचं आहे. पामिंग व्यायाम करण्यासाठी दोन्ही हात एकमेकांवर घास आणि डोळ्याला लावा. मात्र डोळे काही वेळ बंद ठेऊन मोठा श्वास घ्या. असे केल्याने टोळ्यांना आराम मिळतो आणि थकवा कमी होतो.
पापण्यांची उघडझाप करणे : मोबाईल, कॉम्पुटरचा जास्त वापर होत असल्याने पापण्यांची उघडझाप करणे कमी होते. यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे प्रत्येकी 3,4 सेकंदाला पापण्यांची उघडझाप करा. यामुळे डोळ्यांचे स्नायू ऍक्टिव्ह होतात.
हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकरांना सुनावलं; म्हणाले, कुणीतरी विधानसभा अध्यक्षांना सांगा की..
डोळ्यांवर येणारा ताण कमी करा : आजकाल डिजिटल उपकरणांमुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडत चालले आहे. मोबाईल अगदी हातात असल्याने डोळे आणि मोबाईल यांचं यानंतर फारच कमी असत. अशावेळी तुम्ही प्रत्येकी २० मिनीटांनी लांब असलेल्या गोष्टी पाहत चला. यामुळे दूरदृष्टी सुधारते आणि डोळ्यांवर येणारा ताण कमी होतो.
डोळ्यांची हालचाल : डोळ्यांच्या हालचालीवरून डोळ्यांचे रक्ताभिसरण ठरत असते. त्यामुळे डोळ्यांची हालचाल होणे फार गरजेचे आहे. डोळ्यांची हालचाल करण्यासाठी डोळे बंद करून उघडा.
एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करा : डोळ्यांची योग्य काळजी घेण्यासाठी स्नायू लवचिक असणं गरजेचं आहे. त्यासाठी एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करा. तसेच लक्ष केंद्रित केल्याने दूरदृष्टी वाढते आणि डोळ्यांवर येणारा ताण कमी होतो.





