Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

‘पराभव दिसत असल्याने श्रीरंग बारणेंकडून रडीचा डाव’; संजोग वाघेरेंची टीका

पिंपरी | मावळमध्ये ‘संजय वाघेरे’ आणि ‘संजोग पाटील’ नावाच्या दोन व्यक्तींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या नावात आणि अपक्ष दोन्ही उमेदवाराच्या नावांमध्ये काही प्रमाणात साधर्म्य आहे, यातून मतांची विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून, संजोग वाघेरेंनी श्रीरंग बारणेंवर टीका केली आहे.

संजोग वाघेरे म्हणाले की, श्रीरंग बारणे यांना पराभव दिसत असल्याने ते रडीचा डाव खेळत आहेत. यातून बारणे यांचा बलिशपणा दिसतो आहे. नावात साम्य असलेल्या व्यक्ती ते निवडणुकीत उभ्या करत आहेत. सोबत बारणेंचे बगलबच्चे असतात, यातून हा डावपेच श्रीरंग बारणेंचा आहे, हे स्पष्ट होत आहे. ते पुढे म्हणाले, पण मतदारराजा सूज्ञ आहे. ते महाविकास आघाडीला भक्कम पाठिंबा देऊन मला विजयी करतील, असा विश्वासही संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा     –      ‘मविआ, महायुती दोघं सारखीच, यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं’; मनोज जरांगे पाटील 

दरम्यान, मावळ लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मावळात शिवसेना विरूद्ध शिवसेना असाच सामना रंगणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button