breaking-newsMarathi - TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार’; संजय राऊतांची मोठी घोषणा

मुंबई | महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आता महाविकास आघाडीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. काय होईल ते होईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, की मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आजमावायचंच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. आमचं असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात.

हेही वाचा       –       ‘दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकतील’; पृथ्वीराज चव्हाणांना वक्तव्य करणं भोवलं, स्पष्टीकरण देत म्हणाले..

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत असं विधान केलं होतं. त्या संदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, त्यांचं खरं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात एक संस्कृती राहिलेली आहे आणि ती संस्कृती आम्ही देखील पाळलेली आहे. शेवटी राज्याचा विकास आणि जनतेचा विकास महत्वाचा असतो. पण व्यक्तिगत शत्रुत्व ठेवलं नाही पाहिजे. मात्र, दुर्देवाने भारतीय जनता पक्षाने शत्रुत्व ठेऊन राजकारण करण्याची परंपरा सुरु केली, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button