संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
सरकार स्थापनेचा दावा नाही, राज्यपालांच निमंत्रण नाही.

महाराष्ट्र : सरकार स्थापनेचा गोंधळ सुरु आहे. हे एक प्रकारच अराजक आहे. तीन पक्षांना पूर्ण बहुमत मिळालेलं आहे. त्या बहुमतावर लोकांचा विश्वास नाहीय. अनेक गावागावातून फेरमतदान, मतमोजणीची मागणी होत आहे. गावागावातून लोक रस्त्यावर आले आहेत. माळशिरस मारकंडवाडी गावातील लोकांनी ठरवलं आपण बॅलेटवर मतदान करुन गावाचा कौल काय आहे हे निवडूक आयोगाला दाखवायचा. अशा परिस्थितीत मिळालेल्या बहुमतावर जे सरकार स्थापन करायला निघालेले आहेत, त्यांना विश्वास बसत नाहीय. तो गोंधळलेले आहेत,असं खासदार संजय राऊत म्हणाले.
राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. दहा दिवसानंतर पूर्ण बहुमत असलेली आघाडी किंवा पक्ष राज्यापालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाही. आपल्यामागे किती आमदार आहेत? याची यादी देत नाही. राज्यपालाने सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केलेलं नाही. भाजपा प्रदेशाध्यक्ष तारीख जाहीर करतायत. आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरु होते, मंडप घातला जातो, कार्पेट टाकलं जातं. हा काय प्रकार आहे. सरकार स्थापनेचा दावा नाही, राज्यपालांच निमंत्रण नाही. तरीही आझाद मैदानावर तयारी सुरु आहे. आम्ही असतो एवढा उशीर झाला असता तर राष्ट्रपती राजवट लागली असती ,असं संजय राऊत म्हणाले.
असे अपमान सहन करावे लागतील
आझाद मैदानाची पाहणी करायला भाजपचे नेते गेले होते, त्यावरुन शिवसेनेत नाराजी आहे. या प्रश्नावर राऊत म्हणाले की,मूळात ती खरी शिवसेना नसल्यामुळे त्यांना असे अपमान सहन करावे लागतील. डुप्लीकेट प्रोडक्ट असल्यामुळे यापुढे असे अपमान सहन करावे लागतील अडीच-तीन वर्षांपूर्वी गोजांरत होते, कारण त्यांना मूळ शिवसेना तोडायची होती. महाराष्ट्र कमजोर करायचा होते. म्हणून त्यांनी हे घडवून आणलं. आता त्यांना कळेल भाजप काय आहे? त्यांचं अंतरंग काय आहे? असं संजय राऊत म्हणाले.