ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडपुणे

एस. बी. पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई दहावीचा शंभर टक्के निकाल

१०८ विद्यार्थ्यांना ९१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण

पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे. यामध्ये निरंजन अनुसे याला ९८.४ टक्के गुण मिळाले असून त्याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक आरना झांजे आणि खुशी कटारिया ९८ टक्के, तृतीय क्रमांक श्रीजीत राठोड आणि वेदांत मडोली ९७.८ टक्के, चौथा क्रमांक अंकूर हरल आणि आर्या देवशटवार ९७.६ टक्के तर पाचवा क्रमांक सिद्धी जाधव आणि सुधनवा कुलकर्णी यांनी ९७.४ टक्के गुण मिळवले.

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या एकूण २७९ विद्यार्थ्यांपैकी १०८ विद्यार्थ्यांना ९१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तसेच १६५ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषया मध्ये ९१ पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

हेही वाचा –  भाजपा युवा मोर्चा वतीने मोरवाडी येथे निदर्शने

प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button