भाजपा युवा मोर्चा वतीने मोरवाडी येथे निदर्शने
महिलांचा अपमान करणाऱ्या विरोधकांचा धिक्कार असो..!

पिंपरी-चिंचवड : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाला ‘नारी-शक्ती वंदन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) विरोध करणाऱ्या काँग्रेस व इंडी आघाडीतील पक्षांविरोधात देशभरात महिलांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वतीने मोरवाडी येथे जन आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले.महिलांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने मोरवाडी येथे हे करण्यात आंदोलन आले .पिंपरी-चिंचवड शहरातूनही मोठ्या संख्येने युवती युवक युवा मोर्चा पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले
हेही वाचा – मधुमेहींसाठी आंबा खाण्यास किती सुरक्षित? देशातील वाढत्या डायबेटीसच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर काय सांगतात…

महिला आरक्षणास विरोध करून विरोधकांनी आपली महिलांविरोधी मानसिकता उघड केली असून, त्याचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला. देशातील नारीशक्तीचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे. महिला आरक्षणाला अडथळे निर्माण करणारे पक्ष केवळ एका विधेयकाचा नव्हे, तर संपूर्ण स्त्रीशक्तीचा अपमान करत आहेत. हा अपमान भाजप कदापिही सहन करणार नाही. अशी तीव्र भावना यावेळी व्यक्त केली.
या आंदोलनात दिनेश यादव, सुजाता पलांडे, अजित कुलथे, दिनेश काटे, प्रसाद कस्पटे, राहुल खाडे, साची दोषी, रवी जांभुळकर, मयूर काळभोर, देवयानी भिंगरकर, दयानंद बंडगर, प्रदीप नाईक, प्रतीक रामगुडे, ऋषिकेश भालेकर, आदम मुलानी, योगिता जाधव
अर्चना शेंडगे, स्वाती वाघमारे, सुनीता शिंग, शिल्पा शिंग, तनया चरखे ,कोमल गाडगीरे ,प्रतीक्षा देशमुख,भक्ती जकताबा यांच्यासह महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
भाजपा सदैव कटीबद्ध, नारीशक्तीच्या सन्मानासाठी..!





