Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

ट्रेड डीलवरून राहुल गांधींचा सरकारवर आरोप; शेतकऱ्यांबाबत पाच प्रश्न उपस्थित

नवी दिल्ली | लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्रेड डीलवरुन मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. लोकसभेत त्यांनी जे भाषण केलं होतं त्यात त्यांनी मोदींनी देश विकला आणि शेतकऱ्यांनाही विकून टाकलं असा आरोप केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, ट्रेड डीलबाबत त्यांनी अमेरिकेपुढे गुडघे टेकले आहेत असाही आरोप राहुल गांधींनी केला आहे. इतकंच नाही तर आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधींनी पाच प्रश्न नरेंद्र मोदींना विचारले आहेत आणि त्याची उत्तरं मागितली आहेत.

राहुल गांधींनी उपस्थित केलेले पाच प्रश्न:

१) DDG इंपोर्टचा अर्थ काय आहे? भारतातल्या गायी-गुरांना अमेरिकतला मका खाऊ घातला जाणार आहे का? असं केल्याने गायी-म्हशींच्या दुधाचं उत्पादन हे अमेरिकेच्या कृषी उद्योगावर अवलंबून होईल हे वास्तव नाही का?

२) GM मध्ये आपण जर सोया तेलाच्या आयातीची संमती दिली तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान येथील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं काय होणार? ते हा झटका कसा काय सहन करतील?

हेही वाचा     :                हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेत बंजारा समाजाची बैठक 

३) जर तुम्ही अतिरिक्त उत्पादन असं म्हणत असाल तर त्यात कशाचा समावेश आहे? डाळी आणि इतर उत्पादनांसाठी अमेरिकेने दबाव टाकला आहे म्हणून हे म्हणत आहात का?

४) नॉन ट्रेड बॅरियर हटवण्याचा अर्थ नेमका काय आहे? MSP आणि बोनस कमी करण्यासाठीही आता दबाव टाकला जाणार आहे का?

५) एकदा हे दार खुलं झालं तर दरवर्षी हे आणखी मोठ्या प्रमाणावर वाढणार त्यावर आपण नियंत्रण कशा प्रकारे ठेवणार आहात? यासाठी काही उपाय योजना आहेत का?

असे पाच प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले आहेत. आता या प्रश्नांना सरकारच्या वतीने काही उत्तर दिलं जातं का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button