ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहर सेवादल अध्यक्षपदी ज्ञानेश्वर (माऊली) मोरे यांची निवड

कार्यकर्त्यांच्या बळावर शहरात पक्ष संघटना अधिक मजबूत करणार : ज्ञानेश्वर मोरे

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर सेवादल अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. पक्षाच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

ज्ञानेश्वर (माऊली) मोरे हे पक्ष स्थापनेपासून सक्रिय असून त्यांनी पक्षातील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शहर फेरिवाला समिती सदस्य म्हणून कार्य केले आहे. पक्षातील ही सर्व पदे आपल्याला अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाल्याचे मोरे यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा      :            ट्रेड डीलवरून राहुल गांधींचा सरकारवर आरोप; शेतकऱ्यांबाबत पाच प्रश्न उपस्थित 

शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मोरे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराची कार्यकारिणी राज्यातील सर्वांत मोठी आणि कार्यक्षम करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. तसेच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे उभे राहून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि अजित पवार यांच्या विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी कटिबद्ध राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. अजितदादा, सुनेत्रावहिनी आणि पार्थदादांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहरातील सेवादल अधिक सक्षम, संघटित आणि जनतेशी घट्ट नातं जोडणारे बनवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन. कार्यकर्त्यांच्या बळावर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासावर आपण पक्षाची ताकद दुप्पट करू.

– ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, शहराध्यक्ष, सेवादल, राष्ट्रवादी.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button