ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. सुहास कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल नागरिक सेवा उपक्रम

तक्रार निवारण पोर्टल व सोसायटी मॅनेजमेंट वेब अ‍ॅपचे उद्घाटन, प्रभाग ८ मधील नागरिकांना थेट लाभ

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक व शहर सुधारणा समितीचे सदस्य डॉ. सुहास कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या तक्रार निवारण पोर्टल आणि सोसायटी मॅनेजमेंट वेब अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांच्या दैनंदिन तक्रारी, नागरी सुविधा, सोसायटी व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्न यांचे डिजिटल पद्धतीने त्वरित निवारण होण्याचा मार्ग आता सहजसोपा झाला आहे.

या पोर्टल व वेब अ‍ॅपच्या माध्यमातून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, ड्रेनेज, सोसायटीतील अंतर्गत समस्या अशा विविध बाबींवरील तक्रारी नोंदवता येणार असून, संबंधित विभागांपर्यंत त्या थेट पोहोचतील. यामुळे पारदर्शकता वाढण्यासोबतच तक्रारींच्या निवारणाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.

वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपत डॉ. कांबळे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. अनावश्यक खर्च टाळून आरोग्यपूरक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा

पिंपरी-चिंचवडच्या कन्यांची आशियाई तिरंदाजी स्पर्धेकडे विजयी झेप!

या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक निखिल बोऱ्हाडे, डॉ. विलास साबळे, चिखली–मोशी सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, संदिपान झोंबाडे, संतोष निसर्गंध, अझहर खान, प्रा. संजीव सूर्यवंशी, अशोक मोरे, बाबाजी कळमकर, ॲड. अतुल कांबळे, संदिप कुंभार, विश्वनाथ टेमगिरे, पंकज पवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रशासन, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय साधणारा हा उपक्रम प्रभाग क्रमांक ८ साठी दिशादर्शक ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

प्रभागातील नागरिकांच्या तक्रारी वेळेत, पारदर्शक व प्रभावीपणे मार्गी लागाव्यात, यासाठी आम्ही तक्रार निवारण पोर्टल व सोसायटी मॅनेजमेंट वेब अ‍ॅप सुरू केले आहे. डिजिटल माध्यमातून प्रशासन व नागरिक यांच्यात सुसंवाद व समन्वय राखणे अधिक सुकर होईल आणि सेवा अधिक गतिमान होतील. प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही करतो. नागरी सुविधांसह आरोग्यपूरक रक्तदान व पर्यावरणपूरक वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. म्हणून अनावश्यक खर्च टाळून लोकहिताचे उपक्रम आम्ही राबविले.

– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, शहर सुधारणा समिती सदस्य, पिं. चिं. मनपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button