Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

‘हिंदूंमध्ये फूट, हे काँग्रेसचे धोरण’; पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

Narendra Modi | समाजात फूट पाडा आणि सत्ता मिळवा, या सूत्रावर काँग्रेस पक्ष चालतो. हिंदूमध्ये जेवढी फूट पडेल तेवढा त्यांचा फायदा होईल, हे काँग्रेसला माहिती आहे. त्यामुळे हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सातत्याने केला जात असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस बेजबाबदार पक्ष असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. हा पक्ष देशात फूट पाडण्यासाठी नवनवीन ‘नरेटिव्ह’ तयार करीत असतो. मुस्लिमांना भीती दाखवा, त्यांचे ‘व्होटबँके’मध्ये रूपांतरित करा व आपली मतपेढी भक्कम करा हे काँग्रेसचे सूत्र आहे. हरियाणातील विजयाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, की काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या उत्पादनांना हमीभाव कुणी दिला, हे त्यांना माहिती आहे.

हेही वाचा     –      उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा

युवकांना वेगवेगळ्या पद्धतीने भडकावण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला. मात्र युवकांनी भाजपवरच विश्वास ठेवला. हरियाणाच्या निकालामुळे देशाचा ‘मूड’ कळला आहे. काँग्रेसची पूर्ण इकोसिस्टम, शहरी नक्षलवादी टोळी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत होती. मात्र, काँग्रेसचे षड्यंत्र उद्ध्वस्त झाले. दलितांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र हरियाणातील दलित समाजाने भाजपला समर्थन दिले आणि ओबीसीही भाजपबरोबर आहेत, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button