पंतप्रधान मोदींनी देशाची दिशाभूल केलीय का? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल!

Prakash Ambedkar | ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या दिवशी भारताची काही लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडली, असे संरक्षण दलप्रमुख अनिल चौहान यांनी शनिवारी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रथमच मान्य केले, मात्र त्यांनी त्याचे तपशील दिले नाहीत. त्यांच्या या वक्तव्यावरून आता टीकेची झोड उठत आहे. सरकारने दिशाभूल केल्याचा दावा काँग्रेसने केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, की हे एक क्षुल्लक प्रकरण नाहीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची दिशाभूल केलीय का? संरक्षण दलप्रमुखांनी सिंगापूरला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे आपलं नेमकं काय नुकसान झालंय, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी तपशीलवार माहिती देतील का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशाला देणं गरजेचं आहे.
हेही वाचा : नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तारखा ठरल्या, शाही स्नान कधी होणार?
सिंगापूरमध्ये एका मुलाखतीत संरक्षण प्रमुखांनी (सीडीएस) केलेल्या वक्तव्यानंतर, काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलावले तरच हे प्रश्न विचारता येतील. मोदी सरकारने देशाची दिशाभूल केली आहे. युद्धाचे धुके आता दूर होत आहे, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे.