Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पोलिसांच्या मांडीला गोळी कशी लागली? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Prakash Ambedkar | बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला. आरोपी अक्षयला पोलीस चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही यावर भाष्य करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, अक्षय शिंदे या आरोपीला कशाच्या शोधासाठी पोलीस त्याला घेऊन जात होते? कोणालातरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेला आहे का? पोलिसांना लागलेली गोळी मांडीला लागलेली आहे अशी माहिती समोर येत आहे. मग याबाबतचे मेडीकल रिपोर्टही समोर यायला हवे, गोळीबार करणारा व्यक्ती समोरासमोर गोळीबार करतो. मग ती गोळी मांडीला कशी लागली? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा    –      धक्कादायक घटना! महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले 

अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला?

अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला त्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button