अब तेरा क्या होगा मुरली? सुषमा अंधारे यांची पोस्ट चर्चेत

पुणे | पुणे जिल्ह्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून सध्या पुण्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात सातत्याने आरोपांची मालिका चालवली असून, त्यामुळे हे प्रकरण भाजपच्या उच्च पातळीपर्यंत पोहोचल्याची चर्चा रंगली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी विरोधकांच्या टीकेची धार कमी झालेली नाही. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मुख्यमंत्री पदाला जो नडला तो फोडला. सगळ्यात आधी विनोद तावडे, मग पंकजा मुंडे, पाठोपाठ सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटलांनी तर कानाला खडा लावलाय. गडकरी साहेबांनी सौजन्यपूर्ण माघार घेतलीय. अब तेरा क्या होगा मुरली? अशी खोचक पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुरलीधर मोहोळ यांनाही टॅग केले आहे.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ

रवींद्र धंगेकर यांनीही अशाच आशयाची पोस्ट दोन दिवसांपूर्वी केली होती. ते म्हणाले, २०२४ ला एक जण मिडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता, तो कोण आहे आदरणीय फडणवीस साहेबांना माहित आहे. आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या बातम्या खोट्या बातम्या पेरतोय.




