Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

श्रेयस अय्यर गंभीर दुखापतीमुळे आयसीयूमध्ये; अंतर्गत रक्तस्त्रावामुळे वाढली चिंता

Shreyash Iyer | भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याला सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झेल टिपताना झालेल्या दुखापतीनंतर त्याची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या अहवालानुसार, अय्यरला दुखापत झालेल्या ठिकाणी अंतर्गत रक्तस्त्राव (internal bleeding) होत असून, त्याला किमान पाच ते सात दिवस रुग्णालयात राहावे लागू शकते. खबरदारी म्हणून त्याला सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा     :          अब तेरा क्या होगा मुरली? सुषमा अंधारे यांची पोस्ट चर्चेत

वृत्तांनुसार, श्रेयस गेल्या दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये असून, रक्तस्त्रावामुळे संसर्ग होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. पुढील ४८ तास श्रेयसच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. रक्तस्त्राव थांबला नाही तर त्याचा आयसीयूमधील कालावधी आणखी वाढवला जाऊ शकतो.

भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाकडून अय्यरच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button