Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा’; नितेश राणेंची मागणी

Nitesh Rane | विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला. २३७ आमदारांचं बळ महायुतीला मिळालं त्यात लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

नितेश राणे म्हणाले, की हिंदू समाजावर जो अन्याय होतो आहे त्याविरोधात हिंदू न्याय यात्रा आज निघाली होती. आमच्या सिंधुदुर्गात आमच्या हिंदू समाजाने बांगलादेशात असलेल्या हिंदू माता-भगिनी आणि बंधूंसाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी मोर्चा काढला होता. बांगलादेशातले हिंदू एकटे नाहीत हे सांगण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला होता. महाराष्ट्रातला हिंदू समाज त्यांच्याबरोबर आहे. त्यांच्यावर होणारे अत्याचार आम्ही पाहतो आहोत, मात्र आम्हाला विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही हिंदूवर अत्याचार होऊ देणार नाही. त्यामुळेच आम्ही न्याय यात्रा काढली होती.

हेही वाचा     –      ‘आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नाही’; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान 

पाच मिनिटांसाठी पोलीस हटवा, त्यांनी संमती दिली तर मुस्लिमांना, रोहिंग्यांना ठेचायला तेवढाच वेळ लागेल. आमच्या हिंदूंवर बांगलादेशात अत्याचार होत आहेत. आमच्या धर्मगुरुंना, हिंदू बांधवांना ठेचून मारलं जातं आहे. आया बहिणींवर अत्याचार होत आहेत. इस्कॉनच्या धर्मगुरुंना अटक केली आहे. त्यांची केस घेणाऱ्या वकिलांनाही मारलं गेलं आहे. सामूहिक बलात्काराच्या घटना बांगलादेशमध्ये घडत आहेत. याविरोधात आमच्या मनात राग आहे. त्यामुळेच मी तसं बोललो, असं नितेश राणे म्हणाले.

मुस्लिम कुटुंबात दोन अपत्यांपेक्षा जास्त अपत्य असतली तर त्या कुटुंबाला लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये ही आमची मागणी आहे कारण मतदान करताना यांना मोदी नको असतात, हिंदुत्वाच्या विचारांचं सरकार नको. मात्र प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ जास्त प्रमाणात घेणारे मुस्लिम कुटुंब असतात. मग तुम्ही लाभ कशाला घेता? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची जी यादी आहे त्यात जास्तीत जास्त लाभ मुस्लिम आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करणार आहे की आदिवासी समाज वगळून ज्यांना दोनपेक्षा जास्त अपत्यं असतील त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळावं, असंही नितेश राणे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button