Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘जनाब उद्धव ठाकरे तुमची लायकी नाही..’; नवनीत राणा यांची टीका

Navneet Rana | बांगलादेशातील हिंदूंचं रक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी का करु शकत नाहीत? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदीवर टीका केली आहे. दरम्यान, यावरून भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जनाब उद्धव ठाकरे तुमची लायकी नाही, देशाच्या पंतप्रधानांवर बोलायची, अशी खोचक टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

नवनीत राणा म्हणाल्या की, जनाब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा मी हनुमान चालीसा पठण करणार म्हणून मला १४ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. माझ्यावर आणि रवी राणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व कुठे गेलं होतं? आज ते देशाच्या पंतप्रधानांवर बोलत आहेत. जनाब उद्धव ठाकरे तुमची लायकी नाही, देशाच्या पंतप्रधानांवर बोलायची.

हेही वाचा     –      ‘महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बांगलादेशवर जे अत्याचार होत आहे. यावर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू समाजाने मोर्चे काढले, निषेध व्यक्त केला. तेव्हा जनाब उद्धव ठाकरे कुठे होते? तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही. आज टीका करण्यासाठी आणि टोमणे मारण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तुम्ही देशातील पंतप्रधानांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. एका लोकप्रतिनिधीला १४ दिवस जेलमध्ये टाकले, तेव्हा हिंदुत्व कुठे गेलं होतं? असा सवाल देखील नवनीत राणा यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे तुम्ही काळजी करू नका. हिंदूंसाठी आमच्यासारखे हिंदू भक्त या मैदानात आहेत. तुम्ही फक्त आराम करा, तुम्हाला आराम करण्यासाठीच आम्ही सोडले आहे, असा टोला देखील नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. आज फक्त टोमणे द्यायचे, विरोध करायचा म्हणून आज तुम्हाला आठवलं. विधानसभा निवडणुकीत त्यांना जनतेने उत्तर दिलं आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button