Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“काँग्रेसमध्ये ५०० कोटींना मुख्यमंत्रिपद मिळतं”; नवज्योत सिंग सिद्धूंच्या पत्नीच्या वक्तव्यामुळे खळबळ

Navjot Kaur Sidhu | पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी काँग्रेस नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी ५०० कोटी रुपयांची गरज असते, असं त्यांनी म्हटलं आहे.

नवज्योत कौर म्हणाल्या, काँग्रेसने त्यांना पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केलं तर त्यांचे पती सक्रीय राजकारणात परत येतील. आम्ही नेहमीच पंजाब व पंजाबी लोकांबंद्दल, इथल्या संस्कृतीबद्दल बोलत असतो, परंतु, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आमच्याकडे ५०० कोटी रुपये नाहीत. पंजाबमध्ये २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

हेही वाचा       :              राज्याची आर्थिक स्थिती ‘अडचणीत’, दिवाळखोरीचा धोका नाही; मुख्यमंत्र्यांचा दावा 

दुसऱ्या बाजूला नवज्योत कौर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. काँग्रेस खासदार तथा माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, नवज्योत कौर यांचे पती माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे स्वतःच पक्ष देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यात आता नवज्योत कौर सहाय्य करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button