Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बारावीचा निकाल २ मे ला जाहीर होणार; बोर्डाची अधिकृत घोषणा

पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या शनिवार (दि. २ मे) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून त्याची मुद्रित प्रतही घेता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली.

यंदा बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. राज्यातील एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. सीबीएसई आणि सीआयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. विद्यार्थ्यांना mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या संकेतस्थळांवरून निकाल पाहता येणार आहे.

हेही वाचा 

राज्यात सात जिल्ह्यांत आज ‘एमआरआय’ सेवेचे लोकार्पण 

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषय वगळून) कोणत्याही विशिष्ट विषयातील गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत तसेच पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी संबंधित विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावरून स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button