Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

टिळक घरात उमेदवारी मिळावी अशी मुक्ता टिळक यांच्या पतीची मागणी

पुणे : मुक्ता टिळक यांच्यानंतर आमच्याच घरात उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांचे पती शैलेश टिळक यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले.

आता कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मुक्ता टिळक यांच्यानंतर आमच्याच घरात उमेदवारी मिळावी अशी सर्वांचीच इच्छा आहे. उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठीच घेतील आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील, असे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी सांगितले.

मुक्ता टिळकांनी अनेक वर्ष या परिसरात चांगलं काम केले आहे. मतदार संघासाठी काम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी हीच आमची इच्छा आहे. पक्षाने संधी दिली तर नक्कीच मी ही निवडणूक लढणार आहे. मी अनेक वर्ष मुक्तांसोबत काम केलेल आहे, कुणाल देखील चांगलं काम करत आहे, असंही शैलेश टिळक म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button