Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माधुरी हत्तीणीला नांदणीत परत आणण्याचा मार्ग मोकळा

पुनर्वसन केंद्र उभारणीसाठी पूर्वपरवानगी; सुनावणीनंतर कामकाजाला गती

Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीच्या संदर्भात एक महत्त्वाची आणि सकारात्मक अपडेट समोर आली आहे. माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणीत परत आणण्यासाठीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, नांदणी मठाच्या जागेत हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक त्या पूर्वपरवानग्या मिळाल्या आहेत.

मुंबई येथे उच्चाधिकार समितीसमोर झालेल्या सुनावणीत, मागील निर्देशांनुसार डॉक्टर मनोहरण यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीने माधुरी हत्तीणीच्या एकंदरीत आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल सादर केला. तसेच नांदणी मठाचे माहूत आणि माधुरी हत्तीणी यांच्यातील दीर्घकालीन नातेसंबंध विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आल्याची माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली.

पुनर्वसन केंद्राच्या बांधकामासाठी सात टप्प्यांत मंजुरी देण्यात आली असून, सुमारे १२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. सुनावणीत माधुरीच्या आरोग्याबाबत सकारात्मक माहिती देण्यात आली आणि मागील सुनावणीनुसार नियुक्त समितीने समाधानकारक अहवाल सादर केल्याचेही नमूद करण्यात आले.

हेही वाचा      :          पृथ्वीराज चव्हाण जगातील सर्वात मोठे भविष्यवेत्ते; चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला 

उच्चाधिकार समिती (एचपीसी) आणि न्यायमूर्ती वर्मा यांच्यासमोर नांदणी मठ संस्थान, वनतारा आणि महाराष्ट्र शासन यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या संयुक्त प्रस्तावाला पुनर्वसन केंद्र उभारणीसाठी बांधकाम पूर्वपरवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामकाजाला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आजच्या सुनावणीनंतर जागेवरील कामकाजासाठी आवश्यक परवानग्यांच्या प्रक्रियेत सकारात्मकता दिसून येत असून, एचपीसीकडून पुढील कार्यवाहीस गती देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. झालेल्या सुनावणीवर सर्व पक्षकारांनी समाधान व्यक्त केले असून, माधुरी हत्तीणीच्या बाबतीत पुढील प्रक्रिया अधिक गतिमान झाल्याचे वकील मनोज पाटील यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button