महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटीलांना बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी प्रवेश नाकारला

बाळासाहेब थोरात किंवा कुटुंबातील कोणीही नसल्याचे सांगितले कारण
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधील निवासस्थानी प्रवेश नाकारला आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह संगमनेर येथील बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थांनी पोहोचल्या होत्या. तेव्हा त्यांना मुख्य प्रवेशद्वारातुन प्रवेश नाकारण्यात आला. त्यांनी कर्मचाऱ्याशी संवाद साधत आपली ओळख करून दिली मात्र तरही त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. थोरात किंवा कुटुंबातील कोणीही नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाळासाहेब थोरात सध्या मुंबईत उपचार घेत असल्याची महिती असूनही पाटील त्यांच्या निवासस्थानी कशा गेल्या? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सोबतच, सध्या थोरात कुटुंबीय घरी नहीत, तसेच बंगल्यावरील कर्मचाऱ्याच्या कोण आहेत ते लक्षात आले नसेल त्यामुळे असे घडले असावे, असे बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.





