Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात दहा दिवस मांस विक्रीला बंदी

Ashadi Ekadashi 2025 | पंढरपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे, आषाढी वारीनिमित्त पंढरपूर शहर आणि परिसरात तब्बल दहा दिवस मांस विक्रिचे दुकानं बंद असणार आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहा दिवस मांस विक्रीला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आषाढी यात्रेत पंढरपूर शहर व परिसरात तब्बल दहा दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आषाढी यात्रेच्या आधी सात दिवस आणि नंतर तीन दिवस पंढरपूर शहर व पालखी मार्गावर मांस विक्रीला बंदी घालण्याचा मोठा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आहे. यापूर्वी यात्रा कालावधीत फक्त तीन दिवस मांस विक्री बंदीचा निर्णय घेतला जात होता, मात्र यावर्षी तब्बल दहा दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा    :    Iran Israel War : युद्धादरम्यान PM मोदींचा मोठा निर्णय, इराणच्या राष्ट्रपतींना केला फोन

जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या या निर्णयाचं वारकऱ्यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान भविष्यात पंढरपूर शहरात येणाऱ्या रस्त्यांवरील मांस विक्रीचे दुकाने कायमचे बंद करून ठराविक ठिकाणीच मांस विक्रीला परवानगी दिली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button