‘कुणबी-मराठा एकाच नाण्याच्या दोन बाजू’; मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil | राज्यातील सर्व मराठा बांधव एकच असून कुणबी आणि मराठा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे मराठा समाजातील गोरगरीब लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समस्त मराठा बांधवानी एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा आणि कुणबी एकच असून जो लढाया करतो तो क्षत्रिय मराठा आणि जो शेती करतो तो कुणबी. ते एकच आहेत. पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ, कोकण, मराठवाडा मधील मराठे एकच असल्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा : ‘शिवसेनेच्या सातबाऱ्यावर तोतया वारसदारांचे नाव’; भास्कर जाधव यांची टीका
जातीवाद निर्माण करण्यासाठी नव्हे तर गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांच्या आरक्षणसाठी मराठ्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. तुम्ही मराठा, कुणबी असा भेदाभेद करू नका, एकमेकांच्या सुख- दुख्खात सहभागी व्हा, कुणी तुमच्यावर अन्याय केला तर सहन करू नका पण दुसऱ्यावर देखील अन्याय करू नका, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.