नऊ तालुक्यांमध्ये होणार पीएमआरडीएची कार्यालये

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नागरिकांच्या सोयीसाठी भोर, राजगड, मावळ, मुळशी , खेड , हवेली, दौंड , पुरंदर आणि शिरुर या नऊ तालुक्यांच्या ठिकाणी एक कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
पीएमआरडीएच्या २०२५-२६ अर्थसंकल्पास नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मान्यता देण्यात आली. या बैठकीत पीएमआरडीएच्या कामकाजाचे विक्रेंदीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता.
हेही वाचा – ‘प्रत्येकाच्या मनात स्वराज्याविषयी आपुलकी निर्माण केली’; बानगुडे पाटील
त्या प्रस्तावास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ६ हजार २४६ चौरस किलोमीटर एवढे पीएमआरडीएचे क्षेत्र आहे. त्यामध्ये नऊ तालुक्यातील ६९७ गावांचा समावेश आहे.
त्यामुळे या गावातील नागरीकांना कामासाठी पुणे शहरात यावे लागते. त्यासाठी लागणारा वेळ आणि होणारा खर्च विचारात घेतला, तर नागरीकांना ते त्रासदायक ठरते. नागरीकांना सर्व सुविधा, तालुक्याच्या ठिकाणी मिळणे सोईचे व्हावे, यासाठी प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक वेळी प्राधिकरणाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, हा त्यामागे उद्देश असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.