‘प्रत्येकाच्या मनात स्वराज्याविषयी आपुलकी निर्माण केली’; बानगुडे पाटील

पिंपरी : शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही मग ते कोणत्याही प्रांतातील असो, स्त्रीयांचा सन्मान करा, परस्त्री मातेसमान असते अशी अनेक मुल्ये महाराजांनी पुढच्या पिढीला दिली. जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात बजावलेल्या कामगिरीची बरोबरी कोणीच करू शकत नाही.
प्रत्येकाला न्याय मिळेल असे स्वराज्य स्थापन करून प्रत्येकाच्या मनात स्वराज्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे काम त्यांनी केले, असे प्रतिपादन शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी केले.‘असे होते छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान सादर केले. यावेळी ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व 2025 चे आयोजन निगडी येथील शक्ती-शक्ती चौक, अ प्रभाग जवळील नियोजित महापौर निवास मैदान, चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगर, डांगे चौक,थेरगाव तसेच पिंपरी येथील एच. ए. कॉलनी या ठिकाणी 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन निगडी येथील भक्ती शक्ती येथे झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते झाले.
हेही वाचा – ‘सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणे महत्त्वाचे’;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यावेळी माजी नगरसेवक सचिन चिखले, मारूती भापकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य आपत्ती व व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता राजेद्र शिंदे, नितिन देशमुख, बापूसाहेब गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शाहीर रामानंद उगले यांनी शाहिरीतून शिवदर्शन या कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेजस्वी विचार तसेच प्रेरणादायी जीवनावर आधारित पोवाड्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना वडील आप्पासाहेब उगले यांनीही साथ देत आपली शाहिरी सादर केली