ताज्या घडामोडीराजकारण
जालन्यात माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक
कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध

जालना : जालन्यात माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध करण्यात आलेला आहे. यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील पदाधिकाऱ्यांनी केली.
हेही वाचा – तनिषा भिसे प्रकरण: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. घैसास यांचा राजीनामा
शेतकरी कर्जमाफी घेऊन लग्न, साखरपुडे करतात, असं वादग्रस्त विधान मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विरोधक आक्रमक झालेले आहेत. एकीकडे कर्जमाफी मिळणार नसल्याने शेतकरी संतप्त असतानाच दुसरीकडे कोकाटे यांनी केलेल्या विधानामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आज जालन्यात कोकाटे यांच्या निषेधार्थ जोडे मरो आंदोलन करण्यात आलं.