Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

#KunalKamraControversy | मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही; कुणाल कामराची पोस्ट चर्चेत

महापालिका सदस्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे : कुणाल कामरा

Kunal Kamra | प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केल्यामुळे शिंदेंच्या समर्थकांनी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं केली आहेत. तसंच विधानसभेतही कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेचे प्रतिसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराचं वर्तन योग्य नाही. फ्रिडम ऑफ स्पीच असलं तरीही काहीही बोलता येणार नाही कारवाई होईल असं म्हटलं आहे. दरम्यान, या वादानंतर कुणाल कामराने एक पोस्ट केली आहे.

कुणाल कामराने My Statement असं म्हणत त्याने चार पानी पोस्ट लिहिली आहे. पहिल्या पानावर तो म्हणतो, ज्या ठिकाणी माझा शो आयोजित करण्यात आला होता, ती अशा प्रकारच्या शोचीच जागा आहे. हॅबिटट हे ठिकाण, तो स्टुडिओ जे काही घडलं त्यासाठी जबाबदार नाही. या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. त्या ठिकाणी अपशब्दही वापरले गेले. लॉरी भरुन टॉमेटो आणले गेले असं मी ऐकलं कारण आम्ही जे बटर चिकन तुम्हाला वाढलं ते तुम्हाला आवडलं नाही.

हेही वाचा  :  #Maharashtra | विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांचा अर्ज दाखल 

मला धडा शिकवण्याच्या धमक्या देणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी : अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार फक्त श्रीमंतांकडे नाही. तुमच्यासारखे लोक जोक सहन करु शकत नाहीत. एखाद्या वजनदार राजकीय माणसामुळे माझा जो अभिव्यक्तीचा हक्क आहे त्यावर काही परिणाम नाही. मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही. राजकीय सर्कशीवर आणि राजकारणावर मी व्यंगात्मक पद्धतीने बोट ठेवलं आहे, असं दुसऱ्या पानावर म्हटलं आहे.

असो.. तरीही मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. पोलिसांनी आणि न्यायालयाने माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो त्यामुळे अशाही लोकांविरोधात कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते हॉटेल फोडलं. एक जोक ऐकून त्यांनी हॉटेल फोडलं आहे. तसंच जे निवडून आलेले नाहीत अशा महापालिका सदस्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे. हॅबिटट या ठिकाणी तोडफोड करायला ते कुठलीही नोटीस न देता हातोडे घेऊन कसे आले? असं कुणाल कामराने म्हटलं.

माझा फोन नंबर लिक केला गेला आहे. त्यानंतर मला असंख्य कॉल आले आहेत. आता मी ते व्हॉईस मेलवर फॉरवर्ड केले आहेत. मीडियाला माझं सांगणं आहे की तुम्ही जे काही कव्हर करत आहात आणि बातम्या करत आहात ना त्याआधी एक बाब लक्षात ठेवा की पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत आपल्या देशाचा क्रमांक १५९ वा आहे. मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही. मी कुणालाही घाबर नाही. मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही. असंही कुणाल कामराने म्हटलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button