MP Salary Hike | खासदारांच्या पगारात २४ टक्के वाढ! किती पगार मिळणार?

MP Salary Hike | केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या वेतनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला असून यासोबतच माजी खासदारांच्या पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे. संसदीय कार्य मंत्रालयाने सोमवारी या संदर्भात गॅझेट नोटिफिकेशन जारी केले असून ही वाढ १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे.
नवीन निर्णयानुसार लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचे वेतन १ लाख रुपयांवरून १.२४ लाख रुपये प्रति महिना करण्यात आले आहे. तसेच त्यांना मिळणाऱ्या दैनंदिन भत्त्यातही वाढ करण्यात आली असून तो २ हजार रुपयांवरून २ हजार ५०० रुपये करण्यात आला आहे.
हेही वाचा : #KunalKamraControversy | मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही; कुणाल कामराची पोस्ट चर्चेत
याशिवाय माजी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी माजी खासदारांना २५,००० रुपये पेन्शन मिळत होती. ती आता ३१,००० रुपये प्रति महिना करण्यात आली आहे. तसेच पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा दिलेल्या माजी खासदारांना अतिरिक्त पेन्शन २००० रुपयांवरून २ हजार ५०० रुपये करण्यात आली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. वेतनवाढीमुळे सरकारवर अतिरिक्त आर्थिक भार येणार असला तरी खासदारांना अधिक सुविधा देण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.