Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

के. अन्नामलाई यांचा भाजपाला रामराम! तामिळनाडूत नवा प्रादेशिक पक्ष काढणार

K Annamalai | तामिळनाडू भाजपाचे धडाडीचे नेते आणि माजी आयपीएस अधिकारी के. अन्नामलाई यांनी अखेर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी त्यांचा हा राजीनामा स्वीकारला असून, पक्षाकडून याबाबतचे अधिकृत पत्रकही जारी करण्यात आले आहे. अन्नामलाई यांच्या या निर्णयामुळे दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये भाजपाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

राजीनामा देण्यापूर्वी मंगळवारी दिल्लीत अन्नामलाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली होती. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. अगदी ते दिल्ली विमानतळाकडे निघाले असतानाही त्यांना पुन्हा चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, अन्नामलाई आपल्या निर्णयावर ठाम राहिले. सूत्रांनुसार, हा दौरा केवळ पक्ष नेतृत्वाचे आभार मानण्यासाठी होता.

हायकमांडसमोर ठेवल्या होत्या दोन अटी

अन्नामलाई यांनी भाजपा हाय कमांडसमोर दोन पर्याय ठेवले होते. त्यात तमिळनाडू भाजपाचे अध्यक्षपद पुन्हा द्यावे आणि पुढील ७ वर्षांसाठी पूर्ण स्वायत्तता द्यावी. दुसरा पर्याय त्यांना स्वतःचा वेगळा राजकीय मार्ग निवडण्याची परवानगी द्यावी. भाजपाने पहिली अट अमान्य केल्याने त्यांनी पक्षाला निरोप देण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा

कोकण किनारपट्टीवर ढगांची दाटी! महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनची एन्ट्री; हवामान विभागाचा अंदाज

तामिळनाडूत नवा प्रादेशिक पक्ष काढणार

भाजपाला निरोप दिल्यानंतर के. अन्नामलाई यांनी आपल्या आगामी राजकीय प्रवासाचे संकेत दिले आहेत. “आज आम्ही एक चळवळ सुरू करणार आहोत. आमचा नवीन राजकीय पक्ष तामिळनाडूतील पुढील विधानसभा निवडणूक लढवेल,” अशी घोषणा त्यांनी केली.

तामिळनाडूसारख्या राज्यात राष्ट्रीय पक्षाला थेट मुख्य प्रवाहात येणे कठीण आहे. त्यामुळे सर्व घटकांना एकत्र घेऊन जाणारा प्रादेशिक पक्ष हाच सध्या सक्षम पर्याय ठरू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या पुढील रणनीतीबाबत ते आज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

बदलत्या राजकीय समीकरणांमुळे अण्णामलाईंना मोठी संधी

तामिळनाडूतील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डीएमके (DMK) आणि एआयएडीएमके (AIADMK) या दोन्ही प्रस्थापित द्रविडीयन पक्षांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, दाक्षिणात्य अभिनेते जोसेफ विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत अनपेक्षित यश मिळवले असून, काँग्रेस व इतर छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे. नुकतीच विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यातील या बदलत्या राजकीय वातावरणात अन्नामलाई यांना स्वतःसाठी मोठी राजकीय संधी दिसत असून, ते आता नव्या पक्षासह मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button