ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

Industrial Update: इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह’मधील कामगारांसाठी ‘दसरा गोड’

चाकण औद्योगिक पट्टयातील सर्वाधिक वेतनवाढ करार, भाजपा आमदार महेश लांडगे यांची यशस्वी मध्यस्थी

चाकण : चाकण औद्योगिक वसाहतमधील ‘इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या निघोजे आणि महाळुंगे प्लांटमध्ये वेतनवाढ करार केला आहे. या करारानुसार कायमस्वरूपी कामगारांना २१ हजार ३०० रुपये, रोलवर आलेल्या सभासद कामगारांना २ हजार ५०० आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना १ हजार २५० रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून कामगारांनी पेढे वाटत फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये हॉटेल कलासागर, कासारवाडी येथे झालेल्या बैठकीमध्ये चौथ्या वेतनवाढ कराराबाबत चर्चा झाली. यानंतर करारावर संघटनेचे प्रमुख सल्लागार तसेच आमदार महेश लांडगे, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे नेते रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन येळवंडे, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कोपरकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

कराराचा कालावधी दि. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२४ असा तीन वर्षांचा राहील. या करारानुसार संघटनेचे सभासद असलेल्या कंत्राटी कामगारांपैकी ६५ कामगारांना कंपनी रोलवर घेऊन कायम स्वरूपी नोकरी देण्याचे ठरले आहे. रोलवर आलेल्या सभासद कामगारांना २ हजार ५०० पगार वाढ मिळणार आहे. तसेच उर्वरित कंत्राटी सभासद कामगारांना १ हजार २५० रुपये पगारवाढ देण्याचे ठरले आहे. तसेच, उर्वरीत कामगारांना पुढील करारामध्ये कायम करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे.

यावेळी सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, प्रशांत पाडेकर, राजू बोत्रे, संजय पाटील, महादेव येळवंडे, रविंद्र भालेराव, दत्तात्रय गवारे, भट्टू पाटील, कुंदन सोनवणे, संजय बधाले, बाबुराव पोते, दत्ता कांदळकर, नाशिक युनिटचे श्रीकांत पाटील, प्लांट १ युनिट अध्यक्ष सचिन लांडगे, प्रविण गव्हाणे, विनोद दौंडकर, अमित दुधाणे, धनंजय झापर्डे, प्लांट २ चे प्रतिनिधी व युनिट अध्यक्ष उमेश वाडेकर, चेतन हूले, गणेश पापरे, आणि व्यवस्थापनाच्या वतीने व्यवस्थापक दिपाली खैरनार, अनिकेत निलेकर, अनिल कुंभार, महेश सावंत, पवन मालशे, विश्वनाथ पाटील, मयूर पाटील,सिनोज मॅथ्यू, योगेश साळुंखे, पृथ्वीराज देसाई उपस्थित होते.

प्रास्ताविक अनिल कुंभार साहेब यांनी केले. सूत्रसंचालन पुजा थिगळे यांनी केले. खजिनदार अमृत चौधरी यांनी आभार मानले.

वेतनवाढ करारामधील ठळक मुद्दे :
एकूण पगारवाढ : २१ हजार ३००, पगाराचा रेशो: पहिल्या वर्षी ६०% दुसऱ्या वर्षी २०% तिसऱ्या वर्षी २०% ., मेडिक्लेम पॉलीसी:- कुटुंबातील एका व्यक्तीस ३ लाख रुपये या प्रमाणे चार व्यक्तींसाठी १२ लाखांची पॉलिसी. पत्नी, आणि मुलांचाही समावेश, मृत्यू साहाय्य योजना :कंपनीतील कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाल्यास सर्व कामगारांच्या एक दिवसांचे वेतन जमा करून जमा रकमेच्या दुप्पट रक्कम कंपनी कामगारांच्या वारसास देणार., ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी:-मासिक ग्रॉस पगाराच्या ७२ पट रक्कम कंपनीकडून वारसदारास मिळणार, टर्म इन्शुरन्स पॉलीसी: कंपनी कामगाराचा कंपनीमध्ये, कंपनी बाहेर, नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास कामगाराच्या वारसास वार्षिक ग्रॉस पेमेंटच्या ४ पट रक्कम मिळणार, रजा – पीएल २१ , एसएल- १२, सीएल-१२, पीएच – ११. यात.मतदानाची सुट्टी सरकारी आदेशानुसार राहणार आहे., दिवाळी बोनस: सर्व कामगारांना दिवाळी बोनस हा पगाराच्या २०% या प्रमाणे देण्यात येईल., वार्षिक स्नेह संमेलन: सर्व कामगारांचे सहकुटुंब वार्षिक स्नेहसंमेलन प्रत्येक वर्षी सुधारीत पद्धतीने घेण्याचे ठरले आहे., बदलता महागाई भत्ता:- सरकारी नियमानुसार देण्यात येईल. गुणवंत कामगार* – दरवर्षी प्लांट १ व प्लांट २ च्या दोन कामगारांना दहा हजार रुपये रोख स्वरूपात पारितोषिक दिले जाईल. सेवा बक्षीस योजना व प्रत्येक कामगाराला प्रत्येकी ६ महिन्याचा फरक सप्टेंबर महिन्याच्या पगारामध्ये देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button