1 October New Rules | आजपासून आरोग्य आणि सामान्य विमा नियमांमध्ये बदल, वाचा..
1 October New Rules | आरोग्य आणि सामान्य विमा नियमांमध्ये आजपासून बदल होणार आहे. नव्या नियमांनुसार, कॅशलेस क्लेमची रिक्वेट आल्यानंतर एका तासाभरात ते मंजूर करावे लागणार आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर अंतिम परवानगी देखील तीन तासांच्या आत मंजूर करावी लागणार आहे.
लाइफ इन्शुरन्स पॉलिसीधारकांना १ ऑक्टोबर २०२४ पासून त्यांच्या पेआउटवरील टीडीएस कपातीचा फायदा होईल. जीवन विमा पेआउटवरील टीडीएस दर ५ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे. त्यामुळे पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसी सरेंडर केल्यास अधिकचे पैसे मिळतील.
हेही वाचा – ‘शरद पवारांचा वारसा रोहित पवार चालवणार असतील तर..’; सुप्रिया सुळेंचं भुवया उंचावणारं विधान
अर्थसंकल्पात आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी आयडीचा उल्लेख करण्याची परवानगी देण्याची तरतूद बंद करण्याचा केंद्राचा निर्णय आजपासून अंमलात येणार आहे. ऑक्टोबरपासून आयटी रिटर्न भरताना किंवा पॅनकार्डच्या कागदपत्रांमध्ये त्यांचा आधार नोंदणी क्रमांक भरण्याची गरज लागणार नाही.
‘विवाद से विश्वास योजना २०२४’ १ ऑक्टोबरपासून लागू केली जाणार आहे. त्याच्या मदतीने आयकराशी संबंधित वाद मिटवले जातील. न्यायालये आणि न्यायाधिकरणांसमोर प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत.