Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

सराईत गुन्हेगाराचा खासदार श्रीरंग बारणेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश

सराईत गुन्हेगाराचा शिंदे गटात प्रवेश; नंतर निलंबन

पिंपरी : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत सराईत गुन्हेगार प्रशांत भानुदास दिघे याने शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. दरम्यान, प्रशांत दिघे यांच्या प्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रशांत भानुदास दिघे असे शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, चोरी असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला शिवसेना शिंदे गटात प्रवेश देत, चिंचवड विधानसभा युवासेना उपशहरप्रमुख हे महत्त्वाचे पद देखील दिले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढत याबाबत खुलासा केला आहे. काळेवाडीतील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी माझ्याकडे विनंती केल्यावरून प्रशांत दिघे याचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला. वास्तविक त्याची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती. दिघे याचा प्रवेश स्थगित करत असून शिवसेना शिंदे गट या पक्षाशी यापुढे दिघे यांचा काहीही संबंध राहणार नाही. तो पक्षाच्या कोणत्याही पदावर राहणार नसल्याचे वाल्हेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button