breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

क्रिकेटर रवींद्र जडेजाचा राजकारणात प्रवेश, पत्नी रिवाबाने दिली माहिती

Ravindra Jadeja | भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकारणात प्रवेश केला आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा आधीपासून गुजरातमधील जामनगरमधून भाजपच्या आमदार आहेत. रिवाबाने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. रवींद्र जडेजा अधिकृतपणे भाजपचा सदस्य झाला असल्याचे सांगितले. जडेजाने अलीकडेच २०२४ च्या टी२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे, यात आश्चर्याची बाब नक्कीच नाही कारण जडेजा पत्नीबरोबर अनेकदा निवडणुकांच्या वेळेस पत्नीबरोबर होता. रिवाबाबरोबर अनेकदा प्रचार करतानाही जडेजा दिसला आहे. निवडणुकीदरम्यान तो पत्नी रिवाबासह भाजपचा प्रचार करताना दिसला आहे. दोघांनी अनेक रोड शोही केले. जडेजाची पत्नी रिवाबा जामनगर उत्तर मतदारसंघातून आमदार आहे. तर आता रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे.

हेही वाचा    –      राजकारणात जाणार का? गौतमी पाटीलने दिलं भन्नाट उत्तर

रवींद्र जडेजाने T20 विश्वचषक २०२४ नंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने भारतासाठी ७४ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५१५ धावा केल्या आहेत आणि ५४ विकेट घेतले आहेत. १५ धावांत तीन विकेट घेणे ही त्याची सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-२० मधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो भारतासाठी एकदिवसीय आणि कसोटी खेळत राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button