Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करून अटक करा’; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाके जाळून टाकण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, यावरून प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंनाच इशारा दिला आहे. राज ठाकरे तुमची दादागिरी चालू देणार नाही, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, हिंदू राष्ट्र भारत हमारा असं मानणारं आमचं संघटन आहे. मराठी, गुजरात, तामिळ, तेलगू सगळ्यांसाठी महाराष्ट्र-मुंबई एकत्र नांदण्यासाठी आहे. पोलोचे खेळाडू कधीतरी बाहेर येऊन बोलतात. महाराष्ट्रात अशी हिंसा आणि राज ठाकरेंची दादागिरी चालवून घेणार नाही. डंके की चोट पे सांगत आहोत. काही बरेवाईट झालं तर त्याला राज ठाकरेच जबाबदार राहतील. तुम्ही पोलोचे खेळाडू असाल, पाहुणे कलाकारांसारखे येत असाल. पण महाराष्ट्राला पाहुण्या कलाकारांची गरज नाही. राज ठाकरे यांची पुन्हा-पुन्हा दादागिरी खपवून घेणार नाही.

हेही वाचा – ऑक्टोबर हिट तीव्र होणार; हवामान विभागाचा इशारा

राज ठाकरेंची दादागिरी चालून देणार नाही. १५४ कलमांतर्गत कष्टकरी जनसंघाने राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणीही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

आमचे कार्यकर्ते टोल नाक्यांवरून उभे राहून लहान वाहनांवर कर आकारणी होऊ देणार नाहीत. त्यांच्याकडून कर घेतल्यास हे नाके जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button