breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

ऑक्टोबर हिट तीव्र होणार; हवामान विभागाचा इशारा

October Hit : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्यातील अनेक भागातून मान्सूनने निरोप घेतलाय. तसेच देशातील अनेक भागातून मान्सून बाहेर पडला आहे. त्याआधी ऑक्टोबर हिटचा इशारा मुंबई हवामान विभागानं दिलाय. ऑक्टोबर हिट आजपासून म्हणजेच ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ऑक्टोबर हिट १० ते १४ ऑक्टोबरपर्यंत जाणावणार आहे.

यादरम्यान मुंबईच्या उपनगरातील तापमान हे ३४ ते ३५ डिग्री सेल्सिअसमध्ये असेल. तसेच १२ ते १४ ऑक्टोबरमध्ये तापमान थेट ३७ डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. दरम्यान यंदा ऑक्टोबर हिटचे चटके अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीचं वर्तवला होता. महाराष्ट्रात जुलैमध्ये चांगलाच पाऊस बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली होती.

हेही वाचा – Mahadev Online App प्रकरणी ३४ बॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर

मात्र, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला. त्याच दिवसापासून ऑक्टोबर हिटची सुरुवात झाली होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button