ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजयुमो अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे पाटील यांची सामाजिक बांधिलकी!

विधायक पुढाकार : वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

मावळ, पुणे | भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, श्री क्षेत्र देहू-देहूरोड शहर (मंडल) तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष पै. अनिरुद्ध श्रीकांत काळोखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अधिक मासाच्या पवित्र औचित्याने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांद्वारे समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात येणार आहे.

भाजयुमो देहू-देहूरोड मंडलच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, वाढदिवसाचे औचित्य साधून कोणताही दिखाऊपणा न करता समाजोपयोगी कार्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. दिवसभर विविध ठिकाणी सेवा, दान आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.

हेही वाचा

खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि पीसीईटीच्या वतीने रविवारी गुणवंतांचा सत्कार

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता गेथसेमाने आश्रम येथे वृद्धाश्रम भेट आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.४५ वाजता येलवाडी येथील बालकाश्रमात भेट देऊन बालकांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात महाआरती व दर्शनाचा कार्यक्रम होईल. दुपारी १.३० वाजता गोशाळेला भेट देऊन गोमाता पूजन व चारा दान करण्यात येणार असून रात्री ८.३० वाजता देहू येथील इस्कॉन मंदिरात भव्य अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, वाढदिवस आणि अधिक मासाच्या पवित्र मुहूर्तावर पै. अनिरुद्ध काळोखे पाटील हे दुपारी ३.३० नंतर नागरिक, कार्यकर्ते व हितचिंतकांच्या भेटी स्वीकारणार आहेत. या सर्व सामाजिक व धार्मिक उपक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन भाजयुमो देहू-देहूरोड मंडलच्या वतीने करण्यात आले आहे.

वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसून समाजाप्रती आपली जबाबदारी अधिक दृढ करण्याची संधी असते. अधिक मासाच्या पवित्र काळात वृद्ध, निराधार बालके आणि गोसेवा यांसारख्या उपक्रमांद्वारे समाजसेवेचा छोटासा प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

– पै. अनिरुद्ध काळोखे पाटील, अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button