माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी
करूणा शर्मा यांना 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने दिले,आव्हानात्मक याचिका दाखल केली

वांद्रे : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. करूणा शर्मा प्रकरणातील कोर्टाच्या आदेशांना धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं आहे. करूणा शर्मा यांना 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने दिले होते. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आव्हानात्मक याचिका दाखल केली आहे. त्याचसंदर्भात याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
हेही वाचा : मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटींची खंडणी घेताना अटक
‘वांद्रे कोर्टात याचिका दाखल केली होती. दाखल केलेल्या याचिकेमध्ये हीच मागणी केली होती की मी धनंजय मुंडे यांची पहिली बायको आहे. मला पोटगी मिळाली पाहिजे. घरगुती हिंसाचार झाला त्यावर याचिका दाखल केली होती. खालच्या कोर्टात आम्हाला न्याय मिळाला, पहिली बायको म्हणून मी जास्त नाहीतर फक्त 15 लाखांची मागणी केली होती. पण त्यांनी 2 लाखांची पोटगी दिला आहे, मात्र धनंजय मुंडे यांना आम्हाला 2 लाख रूपयेही द्यायचे नाहीत, त्यासाठी त्या ऑर्डरच्या विरोधात धनंजय मुंडे सेशन कोर्टामध्ये गेले आहेत’, असे करूणा शर्मा म्हणाल्या. यावेळी मुंडेंच्या आमदारकी संदर्भात देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘सहा महिन्यात जास्तीत जास्त नऊ-दहा महिन्यांत धनंजय मुंडे यांच्या आमदारकीचा राजीनामा होणार’ अशी भविष्यवाणीच करूणा शर्मा यांनी केली.