Chandrapur Mayor Election | कसा उलटला काँग्रेसचा डाव अन् चंद्रपूर महापालिकेत भाजपा आघाडीचा झाला महापौर!
ठाकरे शिवसेनेला सव्वा वर्षे महापौरपद : चंद्रपूरच्या राजकारणाची महाराष्ट्रभरात चर्चा
नागपूर : ठाकरे शिवसेनेची भूमिका काँग्रेसचा महापौर व्हावा म्हणून आम्हाला सकारात्मक दिसली. चंद्रपूरमधील ही सर्व परिस्थिती आदित्य ठाकरेंच्या कानी टाकली. शेवटी अंतिम निर्णय हा त्यांनाच घ्यायचा होता, असे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केल्याने चंद्रपूरला भाजपचा महापौर कसा झाला? याचा बराच उलगडा झाला आहे.
दुसरीकडे कुठल्याही गटाला महत्व नाही. काँग्रेसचा महापौर व्हावा, ही आमची भूमिका. मोठा पक्ष आमचा. मोठे पद आम्हाला मिळावे, असा विजय वडेट्टीवार यांचा आग्रह होता. मात्र काँग्रेसला हाच दुराग्रह दोन्ही गटांना नडला आणि सत्ता हातातून गेला. भाजपच्या आघाडीचा महापौर झाला.
काँग्रेस एकट्याने लढणार…
चंद्रपूरमध्ये शिवसेना उबाठा,भाजप,शिंदे गट एकत्र आल्यानंतर राज्यात नव्या घडामोडींची चर्चा आहे. अशावेळी पुढील सर्व निवडणुका काँग्रेस एकट्याने लढण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार यांनी याविषयीचे सुतोवाच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी केले आहे. मी ऐकलेले आहे. ते किती खरे त्याविषयी चर्चा झाली नाही. चर्चा झाली तर कळेल.
दरम्यान,महाविकास आघाडीत काँग्रेस आहे की नाही या चर्चेला आज अर्थ नाही. आता निवडणुका नाहीत. साडे तीन वर्षांनंतर हा प्रश्न बघू असे संकेत वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले.




