Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, : महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण निर्माण करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंड, बीकेसी येथे जेन ओ : पिक्सल ॲण्ड प्ले ॲण्ड ग्लोबल ई-स्पोर्ट गेम्स या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे, जेन ओचे संस्थापक श्रीपाद अष्टेकर आणि ग्लोबल ई-स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष पॉल फॉस्टर उपस्थित होते.

गेमिंग क्षेत्रातील करिअरविषयी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माझ्या मुलींने गेमिंगमध्ये करिअर करायचे ठरवले, तर त्यासाठी माझी 100 टक्के परवानगी आणि पूर्ण पाठिंबा असेल. कोणतेही क्षेत्र निवडले तरी मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  राज्यपालांच्या हस्ते लोकभवनात इतिहास व अभिलेख दालनाचे उद्‌घाटन

मुख्यमंत्री कार्यालयाचे 24×7 लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याबाबत विचारले, असता मुख्यमंत्र्यांनी सांगितले केले की, मुख्यमंत्री ऑफिसद्वारे मोठे प्रकल्प आणि महत्त्वाचे निर्णय लोकांसमोर लाईव्ह प्लॅटफॉर्मवर मांडण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी नमूद केले कंटेंट क्रिएटर्सना भेडसावणाऱ्या ‘व्ह्यूज टू व्हॅल्यू’ या समस्येबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासन क्रिएटर्स आणि ब्रँड्स यांच्यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अलीकडेच यूट्यूबचे सीईओ नील मोहन यांच्यासोबत चर्चा झाली असून, क्रिएटर्ससाठी मजबूत इकोसिस्टम तयार करण्यावर भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच एव्हीजीसी (AVGC) धोरणाद्वारे क्रिएटर इकॉनॉमीला चालना दिली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी कंटेंट क्रिएटिव्ह क्षेत्रात औपचारिक शिक्षणाच्या संधी वाढवण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) स्थापन करण्यात आली असून, हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे प्रशिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना गेमिंग, अ‍ॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये करिअरची स्पष्ट दिशा मिळणार आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधांबाबत त्यांनी सांगितले की, राज्यातील 40 हजार गावांपैकी सुमारे 70 टक्के गावांमध्ये फायबर नेटवर्क पोहोचले आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत प्रत्येक गावात उच्चगती इंटरनेट उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे गेमर्सना ‘लॅग-फ्री’ अनुभव मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button