ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारक्तदान

शहरभरात २५ हून अधिक केंद्रांवर रक्तदानाची व्यवस्था

शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची माहिती

पिंपरी- चिंचवड | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने बुधवारी (दि. २२ जुलै) शहरभरात भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील २५ हून अधिक केंद्रांवर रक्तदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रक्ताची वाढती गरज लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शहरातील विविध शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, मंदिर परिसर, समाजमंदिरे आणि सार्वजनिक सभागृहांमध्ये हे शिबिर पार पडणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात काळेवाडी, थेरगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाल्हेकरवाडी, प्राधिकरण आणि आकुर्डी परिसरातील केंद्रांवर रक्तदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर भोसरी विधानसभा मतदारसंघात चिखली, कुदळवाडी, दिघी, भोसरी, मोशी, चऱ्होली, इंद्रायणीनगर, संतनगर, तळवडे आणि यमुनानगर परिसरातील विविध केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा

“मला अंधारात ठेवलं, पण रोहित-विराटसोबत ते करू नका!” युवराज सिंगने व्यक्त केली खंत

या उपक्रमामुळे शहरातील रक्तपेढ्यांना मोठा आधार मिळणार असून, गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा वाढण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवेचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा आम्ही जपली आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या महारक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे आणि गरजूंच्या जीवनरक्षणासाठी हातभार लावावा.”

शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक केंद्रावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून, संपर्कासाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळते. त्यामुळे हा केवळ वाढदिवसाचा उत्सव नसून, जनसेवेचा संकल्प आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे आणि ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश अधिक व्यापक करावा.

– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button