‘नथुराम गोडसे नीच आणि नालायक ब्राह्मण होता’; ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस

Shripal Sabnis | नथुराम गोडसे नीच आणि नालायक ब्राह्मण होता. त्यांने महात्मा गांधींमधील महात्म्याला ठार मारले. आजचे हिंदुत्ववादी त्याच नथुराम गोडसेचे पुतळे व मंदिरे उभारत आहेत. हे धर्माचे नसून धर्माच्या घातकपणाचे कार्य आहे, असे वक्तव्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. तसेच, माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल आपण माफी मागत असल्याचं डॉ. सबनीस यांनी म्हटले आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट येथे श्री शिवाजी महाविद्यालयात वाङमय विलास गौरवग्रंथ व विलास तायडे लिखित बैलबंडी ते हवाई दिंडी पुस्तक प्रकाशन व नागरी सत्कार समारंभ रविवारी आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ. श्रीपाल सबनीस यांनी नथुराम गोडसे व ब्राह्मण समाजावर तोंडसुख घेऊन हिंदुत्ववाद्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
हेही वाचा : शरद पवार गप्प कसे राहु शकतात? संजय राऊतांचा सवाल
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, नथुराम गोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण. या माणसाने महात्मा गांधी यांच्यामधील महात्म्याला मारलं. त्याचे हे हिंदुत्व आजचे हिंदुत्ववादी डोक्यावर, कपाळावरती टीळा लावून फिरत आहेत. नथुराम गोडसेचे पुतळे, मंदिरे उभारत आहेत. हे धर्म कार्य नव्हे, तर हे धर्माचे घातकपण आहे. अशा धर्मापासून देशाचे संरक्षण करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे विवेकी धर्मनिष्ठ हा महत्त्वाचा विचार आहे. मी पुर्वजांच्या पापांबद्दल आज तुमच्या सर्वांसोबत माफी मागतो, असंही ते म्हणाले.