Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आकुर्डी गावठाणात हातगाड्यांवर पालिकेची कारवाई

पिंपरी – महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आकुर्डी गावठाणात कारवाई करून लोखंडी काऊंटर आणि हातगाड्या जप्त केल्या आहेत.

 

पिंपर-चिंचवड महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तिव्र केली आहे. आज मंगळवारी (दि. 31) अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. बंटी ग्रुपसमोर तसेच अक्सिस बॅंकेच्या परिसरात कारवाई करून लोखंडी काऊंटर आणि 11 हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

 

सहशहर अभियंता यांचे अधिपत्याखाली महापालिकेचे संबंधीत कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली ४ कार्यालयीन अधीक्षक, ८ मुख्य लिपिक, ४० मजूर, १ मनपा पोलीस उपनिरीक्षक, १० मनपा पोलिस, ५ डम्पंर, १ क्रेन, 1 जेसीबी तसेच २ कनिष्ठ अभियंता, ३ बीट निरीक्षक आदींचे कारवाई करताना सहकार्य लाभले.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button