Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
शिंदे-फडणवीस सरकार जाणार? देवेंद्र फडणवीसांच्या ट्वीटने चर्चांना उधाण

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, काल अजित पवार यांनी माध्यामांना आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं सांगितले. त्यामुळे या चर्चांना पुर्णविराम लागला आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटने शिंदे-फडणवीस सरकार जाणार? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन फोटोसह हे ट्वीट केलं आहे. मिशन नो पेंडेन्सी, कार्यालयीन कामकाजातील प्रलंबित कामे मार्गी लावताना असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. ते टेबलवर ठेवलेल्या फायलींवर सही करत आहेत. त्यांच्या या ट्वीट मुळे राज्यात पुन्हा राजकीय भुकंप येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.





