ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

ताथवडे-पुनावळे-वाकड प्रभागातून चित्रा पवार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी!

मिशन- PCMC: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पवार कुटुंबीयांना पुन्हा ताकद

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 2025-26 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ताथवडे-पुनावळे-वाकड प्रभाग क्रमांक 25 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महिला सर्वसाधारण गटातून अधिकृत उमेदवार म्हणून चित्रा संदीप पवार यांना संधी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबियांना मोठी ताकद दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिसत होता. आज चित्रा पवार यांनी आपल्या प्रभागातील मोजक्या सहकाऱ्यांसोबत उमेदवारी अर्ज दाखल केला. ग्रामदैवत श्री. नृसिंह देवस्थान मंदिरात आशिर्वाद घेतले आणि आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे.

ताथवडे-पुनावळे येथील संदीप पवार कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत स्थापनेपासून एकनिष्ठ राहिले आहेत आणि या निवडणुकीत त्यांना संधी देण्यात आली आहे. ताथवडे-पुनावळे-वाकड प्रभाग क्र. 25 मध्ये माळवाडी, पुनावळे, पांढरे वस्ती, काटेवस्ती, नवले वस्ती, ताथवडे, अशोकानगर, निवाळकरनगर, भुमकरवस्ती, वाकड, काळा-खडक, मुंजोबानगर, मानेवस्ती, भुजबळ वस्ती, वाकडकर वस्ती, रोहन तरंग सिटी साेसायटी, प्रिस्टाईन सोसायटी आणि स्वरा प्राईड रेसीडेन्सी या भागाचा समावेश आहे.

चित्रा पवार यांनी प्रभागाच्या सर्वांगीन विकासाचा संकल्प व्यक्त करत म्हटले की, “घड्याळ तेच… फक्त वेळ नवी! गेल्या 10 वर्षांपासून कोणतेही पद नसताना आम्ही प्रभागातील काम करत आलो आहोत आणि भविष्यातही काम करत राहू.” त्यांनी प्रभागातील माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि सोसायटीधारक यांच्या सक्रिय सहभागासह विकासाच्या सर्व उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार चित्रा पवार यांनी मानले आहेत.

“ कोणतेही राजकीय पद नसताना आम्ही पवार कुटुंबियांनी गेल्या १० वर्षांपासून प्रभागासाठी काम केले. कोविड काळातसुद्धा आम्ही लोकसेवेचे व्रत जोपासले आहे. आता या परिसराचे प्रतिनिधीत्व महानगरपालिकेत करण्याची संधी मिळाली आहे, प्रभागाचा सर्वांगीन विकास सुनिश्चित करण्यासाठी सर्व स्थानिक नागरिक, सोसायटीधारकांना सोबत घेवून विकासाची वाटचाल करण्याचा संकल्प आहे.
– चित्रा पवार, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस. प्रभाग- 25.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button