Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

CBSE बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल; 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा ‘या’ दिवशीचा पेपर पुढे ढकलला

CBSE Board Exam 2026 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२५-२६ या शैक्षणिक सत्रातील १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केला आहे. बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीनुसार, ३ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ३ आणि ४ मार्च रोजी होणाऱ्या होळीच्या सणामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे, मात्र बोर्डाने या बदलासाठी प्रशासकीय कारणांचा हवाला दिला आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, १० वीची ३ मार्च रोजी होणारी परीक्षा आता ११ मार्च २०२६ रोजी घेतली जाईल. तसेच, १२ वीची ३ मार्च रोजी होणारी परीक्षा आता १० एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे.

हेही वाचा –  पुण्यात वाहतुकीचा वेग 10 टक्क्यांनी वाढला; 30 किमी प्रतितासचे लक्ष्य

या बदलामुळे १० वीच्या जर्मन, तिबेटी, नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC), बोडो, जपानी, स्पॅनिश, काश्मिरी, मिझो आणि एलिमेंट्स ऑफ बुक कीपिंग यांसारख्या विषयांच्या परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. तर १२ वीचा लीगल स्टडीज या विषयाचा पेपर आता एप्रिल महिन्यात होईल. सीबीएसईची मुख्य परीक्षा १७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार असून १० वीची परीक्षा १० मार्चऐवजी ११ मार्चला संपेल, तर १२ वीची परीक्षा ९ एप्रिलऐवजी १० एप्रिलपर्यंत चालणार आहे.

मंडळाने स्पष्ट केले आहे की, ३ मार्च व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयांच्या तारखांमध्ये बदल झालेला नाही. शाळांनी हा बदल विद्यार्थी आणि पालकांच्या निदर्शनास आणून द्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर देखील या नवीन तारखांची नोंद केली जाईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button