breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ; नाकाबंदी, पेट्रोलिंग गस्त वाढविण्याची नाना काटे यांची मागणी

चिंचवड : चिंचवड मतदार संघातील वाकड, पिंपळे सौदागर थेरगाव, पिंपळे निलख, सांगवी परिसरातील पोलीस ठाणे हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून दागिने, मोबाईल हिसकावने, पाकीट मारणे, घरफोडी, चोरीच्या व इतर घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिसांकडून पेट्रोलिंग, गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांनी केली आहे.

नाना काटे यांनी सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड मतदार संघातील वाकड, पिंपळे सौदागर थेरगाव, पिंपळे निलख, सांगवी परिसरातील पोलीस ठाणे हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून दागिने, मोबाईल हिसकावने, पाकीट मारणे, घरफोडी, चोरीच्या व इतर घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

हेही वाचा –  निवडणूक प्रक्रियेबाबत काँग्रेसचे आयोगाला सवाल; पुराव्यासह मागितली उत्तरे

हा प्रकार नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात उच्चभृ सोसायट्या आहेत. त्यातील नागरिक वॉकिंग, खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणत येत असतात. तसेच इथे छोटे मोठे हॉटेल व इतर व्यवसाय असून, रात्री त्यातील कामगार, मालक घरी परतत असताना त्यांना या चोरट्यांकडून धारदार हत्यार किंवा बंदुकीच्या धाकाने त्यांच्याकडील मोबाईल, पर्स, दागिने व बाकीचे ऐवज लुटले जातात.

त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये सध्या दहशत व भीतीचे वातावरण निर्माण होत असून ही खूप गंभीर बाब आहे. तरी या प्रकाराकडे गांभीर्याने दखल घेऊन, योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच चिंचवड मतदार संघातील या परिसरात नाकाबंदी व पेट्रोलिंग गस्त वाढविण्यात यावी. आणि चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणावे अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button